Observe ⇒ Differentiate ⇒ Identify ⇒ NURTURE

Ancient routes and plant diversity of Harishchandragad

Here is a lesser know day trek around Harishchandragad fort (20 Nov 2022). The walk starts from a plateau near 'Pachnai' village. Through the dense thicket of forest, the route opens on a ridge with 'Mula' river basin on right hand side. Just before the hilltop, one can see remains of a fortification. Little further on a small plateau, there is a water tank carved in rocks. On the top there is a small 'Vetal baba' temple. Climb down is slippery with a lot of loose gravel. Too much fun!!

Harishchandragad is an ancient fort spread on a large area. There are 3 to 4 well known routes to climb the fort. Vinayak Wadekar from Sangamner, has discovered another 15/17 routes with the help of local villagers. Locals are using these ancient routes as part of faith and folklores and have given them interesting names.

This walk near Pachnai is an attempt to record this less trodden route, its floral diversity, geological structures and natural beauty.

हरिश्चंद्रगड परिसरातील अनवट वाटा आणि वनस्पती वैविध्य

संगमनेरचे विनायक वाडेकर यांच्याबरोबर हरिश्चंद्रगड परिसरात फिरण्याचा योग आला (२० नोव्हेंबर २०२२). "पाचनई" गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या "पिंपरी पठार" पासून ट्रेकला सुरुवात झाली. "वेताळाच्या धारेनी" डोंगर माथ्यावर चढण्यास सुरुवात केली. चढताना उजवीकडे "मुळा" नदीचे पात्र धुक्यात वेढलेले होते. डोंगरमाथा जवळ आल्यावर एका ठिकाणी "तटबंदीचे" अवशेष दिसले. अजून थोड वर चढल्यावर तर चक्क कातळात कोरलेली पाण्याची "टाकी" सुद्धा दिसली. डोंगर माथ्यावर वेताळ बाबाचे मंदिर होते. मंदिराच्या आजूबाजूला रांजणखळगे बघून आश्चर्यच वाटलं. या निसर्गरम्य परिसरात थोडा वेळ घालवून, "गवळ्याच्या नळीने" किंवा "गवळ्याच्या झुरीने" (वाटेने) आम्ही परत फिरलो.

हरिश्चंद्रगड हा आडवा तिडवा पसरलेला, प्रचंड विस्ताराचा, प्राचीन किल्ला आहे. किल्ल्यावर जाण्याच्या तीन, चार वाटा परिचित असल्या तरी, विनायक दादांनी स्थानिकांच्या मदतीने अजून १५/१७ वाटा शोधून काढल्या आहेत. या अनवट वाटा गावकऱ्यांनी आपल्या परंपरांतून, श्रद्धेतून, त्यांना वेगवेगळी नाव देऊन जागत्या ठेवल्या आहेत.

पाचनई जवळील ही वाट, येथील प्राचीन पुरावे, वनस्पती वैविध्य, भौगोलिक रचना, आणि निसर्ग सौंदर्य याची नोंद करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

Plant Identification: Ushaprabha Page
Route GPS mapping: Ajit Nigde     Open the location in Google map  Marker_locate

"Vetalachi Dhar" / "वेताळाची धार"

   

"Gavlyachi Zuri" / "गवळ्याची झुरी"

Click the icon in below map to view the flowers (24 species) and surrounding scenery along with the description. Click Fix the image to view the map full screen.




Contact - Mandar Joshi, 0091-9637527026, [email protected]
Copy Right - All images & text description on this site are copyrighted and may not be used without permission.